वसई परिसरात सोमवारी गोळीबाराची घटना समोर आली आहे. वसई पूर्वेच्या वालीव परिसरात दोन गटातील किरकोळ वादातून फायरिंग झाल्याची घटना समोर आली आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला असून आरोपी फरार झाले आहेत. या संदर्भात वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.
वसईच्या पूर्वेच्या नाईक पाडा परिसरात असलेल्या नाईकपाडा येथे ही घटना सोमवारी ६ वाजताच्या दरम्यान घडली आहे. यात रस्त्यावरून दोन वाहने जात होती एका वाहनात ३ जण तर दुसऱ्या वाहनात चार जण प्रवास करत होते. नाईकपाडा येथे या वाहनांची एकमेकांना टक्कर झाल्याने दोन गटात वाद सुरू झाला
यावेळी तीन जण असलेल्या वाहनातील इसमांनी तलवारी बाहेर काढल्याने, चार जण असलेल्या वाहनातील ३ जण पळून गेले. दरम्यान एकाला या चार जणांनी तलवारीने जखमी केले असून पिस्तुलातून गोळीही झाडली गेली आहे. त्यात हा इमस जखमी झाला आहे. जखमी इसमाला गाडीत घालून हे चार जण फरार झाले.
काही वेळात या जखमी इसमाला वसईच्या प्लाटिनियम रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या इसमाला विचारपुस केली असता त्याचे नाव हरकिशन सिंग असल्याचे त्याने सांगितले. सदरचा इसम हा नाईकपाडा येथील भीमनगर येथील रहिवाशी आहे. त्यावर हल्ला करणारे आरोपी सुद्धा याच परिसरातील असल्याची माहिती जखमीने पोलिसांना दिली आहे. जखमीवर उपचार सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
0 Comments