धक्कादायक! गुजरातमध्ये कामावरून काढून टाकलं म्हणून दोन कामगारांकडून मालकासह तिघांचा खून

गुजरातमध्ये दोन कर्मचाऱ्यांनी कामावरून काढल्याच्या रागातून थेट मालकाची चाकू भोसकून हत्या केली. हा प्रकार सुरतमधील अमरोलीत एका भरतकामातून वस्तूनिर्मिती करणाऱ्या कंपनीत हा प्रकार घडला. घटनेनंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोन आरोपींपैकी एक अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मालक कल्पेश ढोलकिया (३६) त्यांचे वडील धनजी ढोलकिया (६१) आणि मामा घनश्याम रजोडिया (५६) आपल्या कंपनीत आराम करत असताना आरोपी कर्मचाऱ्यांनी चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर झालेला आरडाओरडा ऐकून इतर कामगार घटनास्थळावर आले आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने तिघांचाही उपचारादरम्यानच मृत्यू झाला. अमरोली पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपी कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. अशोक राऊत (२१) असं आरोपीचं नाव आहे. अन्य एक आरोपी अल्पवयीन असून वय १७ वर्षे आहे. दोन्ही आरोपी सुरत महानगरपालिका हद्दीत राहत असून मूळचे ओडिशातील कोसाड आणि गंजम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी मालक कल्पेश यांनी १० दिवसांपूर्वीच दोन्ही आरोपी कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं होतं. रविवारी (२५ डिसेंबर) सकाळी कल्पेश वडिल आणि मामांसोबत कंपनीत आला. तेव्हा दोघे कामगार झोपलेले होते यानंतर त्यांनी कामगारांना फटकारलं आणि कामावरून काढून टाकलं. यानंतर काही वेळातच दोघे कामगार परत आले आणि त्यांनी मालक कल्पेशसह वडिल आणि मामांवर हल्ला केला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e