गुजरातमधील सुरत येथून सुमारे ४० प्रवासी घेऊन मध्य प्रदेश राज्यातील खरगोन येथे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बालाजी राणा (जीजे ०३, बी. व्ही. ८६२१) पहाटे सव्वातीनच्या सुमारास शहरानजीक प्रकाशा रस्त्यावरील १३२ केव्हीजवळ भरधाव येत असताना चालकाने वेग व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला धडक दिली. धडक देताच ट्रॅव्हल्स उलटली व चालक नौशाद खान युनूस खान (वय ३५, रा. बोकऱ्याना, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) लागलीच फरारी झाला. चालकाविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार तपास करीत आहेत.कानठळ्या बसविणारा आवाजदरम्यान, भरधाव येणाऱ्या या खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये ४० प्रवासी बसले होते. पहाटेच्या सुमारास बस डिव्हायडरला ठोकल्यानंतर कानठळ्या बसविणारा मोठा आवाज झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. या वेळी एकच आक्रोश झाल्याने परिसरातील रहिवाशांनी धाव घेऊन जखमींना शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याच दरम्यान रात्रीच्या गस्तीपथकावर असलेल्या पोलिसांनीही तत्काळ हजेरी लावून अपघातग्रस्तांना मदत केली
तत्काळ उपचार, तिघांना हलविलेदरम्यान, अपघात झाल्यानंतर जखमींवर शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात तत्काळ उपचार करण्यात आले. त्यातील नंदनबाई रणसोरे, वीरेंद्र शर्मा, शक्ती आगोळे यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना इजा झाली.अपघातातील जखमींची नावेममता कृष्णा पांडे (वय ३९, रा. कवाना, ता. म्हैसूर, जि. खरगोन), शिवम गणेश मकवाने (१५, रा. कवाना, ता. म्हैसूर, जि. खरगोन),संतोष द्वारका गोयल (४५), प्रमिलाबाई संतोष गोयल (४०, रा. केपा, ता. कसरावद, जि. खरगोन), भूमिका विकास रनसोरे (७, रा. करडी, ता. म्हैसूर, जि. खरगोन), कुणाल हेमंतभाई जारीवाला (२९, रा. सुरत), नंदनबाई बलराम रणसोरे (५०, रा. करडी, ता. म्हैसूर, जि. खरगोन), लंकेश धर्मेंद्र चटीय (३२, रारायबेडपुरा, ता. खरगोन), वीरेंद्र रामदास शर्मा (४०, रा. मनावर, ता. मनावर, जि. धार), शक्ती प्रकाश आठोडे (२१, ट्रॅव्हल्सचा हेल्पर, रा. उमेरखडी, ता. गोगवा, जि. खरगोन), राजनाथ नथू प्रसाद करण (६५, बिगदा, जि. धार), विकी राजनाथ करण (२५, रा. बिंवडा, मध्य प्रदेश.) सर्व जखमी मध्य प्रदेशातील आहेत.
0 Comments