आरोग्य सेवा देण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इमारतीचे आरोग्यच धोक्यात आले असून इमारत धुळ खात पडली आहे.नवापूर शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अपघात झाल्यास जखमींना व परिसरातील नागरिकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी या ट्रामा केअर सेंटरचा उपयोग होऊन भविष्यात अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचू शकणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते, दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्यात मात्र मोठ्या संख्येने अपघात ही व्हायला लागले.अपघाताचे प्रमाण पाहता सरकारने एक आराखडा तयार केला. ट्रामा केअर सेंटर कुठे असायला हवे यासाठी स्थापन झालेल्या समितीने नवापूर येथे ट्रामा सेंटर उभारण्याचे ठरविण्यात आले. जिल्ह्यातील पहिल्या आधुनिक अशा सुसज्ज इमारत उभी राहिली असून या सेंटरचा नागरिकांना लाभ होणार आहे. मात्र सदर इमारतीचे उद्घाटन होऊन दोन महिने झाले तरी आरोग्य सेवा सुरू नाही. सेंटर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रतीक्षेत आहे
कोरोना काळातही नवापूर येथे आवश्यक बेड उपलब्ध होत नसल्याने ट्रामा केअर सेंटर इमारतीचा उपयोग पर्यायी व्यवस्था म्हणून करण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत वेगात सुरु असून पुढच्या दोन तीन महिन्यात हा महामार्ग सुरु होईल. महामार्गावर अपघात झाल्यास एखाद्या अपघातग्रस्त रुग्णाला अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटरचा उपयोग होईल. परंतु, त्याठिकाणी आधी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणे आवश्यक आहे.असे आहे ट्रामा केअर सेंटरराष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि त्यात जखमी होणाऱ्या रुग्णांना तसेच, स्थानिक रुग्णांना तत्काळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात २० खाटांची सुविधा उपलब्ध आहे.याठिकाणी अपघात विभाग, एक्स-रे विभाग, सोनोग्राफी विभाग, आय.सी.यु विभाग, ऑपरेशन थिएटर अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे. या रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ, बधीरीकरण तज्ज्ञ, अपघात वैद्यकीय अधिकारी तसेच इतर आरोग्य कर्मचारी असे एकूण १५ अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत."आवश्यक वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त असल्याने पूर्ण क्षमतेने ट्रामा केअर सेंटर सुरु नाही."- डॉ. चारुदत्त शिंदे जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार
0 Comments