शेतात एका कुडामातीचे घराजवळ कपाशी पिकाचे शेतात एक इसम हालचाली करत असल्याचे दिसून आले. पथकाने गणेश शिवाजी भंडारी (वय- 43, रा. शहाणा) ताब्यात घेतले. पथकाने कपाशी पिकाचे शेताची पाहणी केली असता आतील बाजुस हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. पथकाने संपुर्ण शेती पिंजुन काढली असता तेथे संपूर्ण शेतातून 333 किलो 838 ग्रॅम वजनाचे 23 लाख 36 हजार 796 रुपये किंमतीची एकुण 3600 गांजाची झाडे मिळून आली. सर्व गांजाची झाडे जप्त करण्यात आली. तसेच गणेश शिवाजी भंडारी याच्याविरुध्द शहादा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 चे कलम 8(क),20(ब),आयआय,(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार दिपक गोरे, राकेश वसावे, पोलीस नाईक पुरुषोत्तम सोनार, विकास कापूरे, मनोज नाईक, सुनिल पाडवी, विशाल नागरे, बापू बागूल, संजय रामोळे, तुषार पाटील पोलीस शिपाई विजय ढिवरे, रामेश्वर चव्हाण, चेतन चौधरी, आनंदा मराठे, दिपक भोई यांच्या पथकाने केली.
0 Comments