सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा अभियंत्यांनी ७३ रस्ते कागदोपत्री दाखवून तब्बल १० कोटी ७ लाख रुपये हडपल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदावरही काम केले नसलेल्या सिल्लोड, फुलंब्री तालुक्यांतील 73 रस्त्यांची बनावट देयके तयार करून शासकीय कोषागारातून 10 कोटी 7 लाख रुपयांची रक्कम लाटण्यात आलीय.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 10 कोटी रुपये लाटणाऱ्या सहा अभियंत्यांच्या विरोधात रोजगार हमी योजनेचे नायब तहसीलदार राजेंद्र विठ्ठलराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यातील आरोपींमध्ये सार्वजनिक बांधकामच्या सिल्लोड उपविभागाचे शाखा अभियंता के.एस. गाडेकर, उपविभागीय अभियंता एम. एम. कोल्हे, शाखा अभियंता बी.बी. जायभाये, आर. जी. दिवेकर, ए.एफ. राजपूत (सेवानिवृत्त) आणि नागदिवे यांचा समावेश आहे.
0 Comments