नीलेश रमेशचंद्र अग्रवाल (रा. साईशांती भवन सोसायटी, देवळाली कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. तीसवर्षीय महिला, रवी वाघ (४०, रा. गवळी वाडा, देवळाली कॅम्प) व गणेश (४०, रा. भुसावळ, जि. जळगाव), अशी आठ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या संशयितांची नावे आहेत.संशयितांनी संगनमत करून फिर्यादी नीलेश अग्रवाल यांना एका महिलेवर वाईट कॉमेंट करता, तुला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू, तसेच समाजात बदनामी करू, अशी भीती घातली. त्यानंतर संशयित महिला, रवी वाघ व गणेश यांनी अग्रवाल यांना चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.एवढेच नव्हे, तर या अग्रवाल यांच्याकडून आठ लाख रुपयांची खंडणी उकळली. हा प्रकार ९ ते १३ एप्रिलदरम्यान देवळाली कॅम्प येथे घडला. या घटनेनंतर अग्रवाल यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध खंडणीची फिर्याद दिली असून, तिघांपैकी रवी वाघ याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदेश पाडवी करीत आहेत.
0 Comments