दोंडाईचा बाजार समिती निवडणुकीत छाननीत 9 उमेदवारांचे 11 अर्ज बाद

चिमठाणे (जि.धुळे) : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बुधवारी (ता. ५) दुपारी बाराच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली छाननी करण्यात आली
छाननीत ९ उमेदवारांचे ११ अर्ज बाद झाले असून, त्यात बाजार समितीचे माजी सभापती व शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप पाटील व शिंदखेडा पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा पाटील यांचा समावेश असल्याने तालुक्यात याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूक २०२३ ते २०२८ या कालावधीकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी छाननीअंती पंचायत समिती व बाजार समितीचे माजी सभापती दिलीप पाटील यांनी एकच सूचक दिल्याने त्यांचे दोन्ही अर्ज बाद झाले, तसेच शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा पाटील यांचाही उमेदवारी अर्ज बाद झाल्याने आचार्य व्यक्त करण्यात येत आहे
त्याचप्रमाणे सुनील लांडगे, रेखाबाई पवार, सुनील लांडगे, येसूबाई पवार, सुमनबाई फुलपगारे, साहेबराव फुलपगारे, सोनी ईशी, योगेंद्र घरटे यांचेही अर्ज नामंजूर करण्यात आले. आता २०४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. २० एप्रिलपर्यंत माघारी घेण्यात येणार आहे

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e