नागपूर येथे पती शारीरिक सुख देत नाही, उपचारही घेतले, मात्र...; पुण्यात नोकरी करण्याऱ्या महिलेची तक्रार

लग्नानंतर मोहित हा आपल्या पत्नीला शारीरिक सुख देत नव्हता. त्यामुळे तिने मोहितला डॉक्टरला दाखवण्यास सांगितले. ऑगस्ट २०२१मध्ये मोहितने डॉक्टरकडून उपचार घ्यायला सुरुवात केली. पती शारीरिक सुख देत नाही. सतत मानसिक छळ करतो, अशी तक्रार खुद्द पत्नीनेच अजनी पोलिस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी युवकाविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मोहित (वय ३७,बदललेले नाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. शांतीप्रिया (वय ३५,बदललेले नाव) ही पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापक आहे. मोहित याचा औषध विक्रीचा व्यवसाय आहे. नोव्हेंबर २०२०मध्ये शांतीप्रियाचे मोहितसोबत लग्न झाले. लग्नानंतर मोहित हा शांतीप्रियाला शारीरिक सुख देत नव्हता. शांतीप्रियाने त्याला डॉक्टरला दाखविण्यास सांगितले. ऑगस्ट २०२१मध्ये मोहितने डॉक्टरकडून उपचार घ्यायला सुरुवात केली. काही दिवसांनी मोहितने शांतीप्रिया यांच्या भावाला फोन केला. तुझी बहीण मला शारीरिक सुख देत नाही, अशी तक्रार केली. तिच्या भावाने आई-वडिलांना सांगितले. आईने शांतीप्रियाला फोन केला. जे ऐकले ते खरे आहे का, तुझ्या आयुष्यात काही समस्या आहेत का? अशी विचारणा केली. शांतीप्रियाला धक्का बसला. तिने मोहितच डॉक्टरकडून उपचार घेत असल्याचे आईला सांगितले. दरम्यान, शांतीप्रियाने उच्च शिक्षणाची तयार सुरू केली. ती आभासीपद्धतीने वर्गात हजेरी लावायची. मोहित याने तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात करून मानसिक छळ सुरू केला. शांतीप्रियाने नातेवाइकांना सांगितले. दोन्ही कुटुंबातील सदस्यांची बैठक झाली. यात सामंज्यस झाले नाही. त्यानंतर शांतीप्रिया माहेरी आली. त्यानंतर पुन्हा बैठक झाली. मी माझ्या पतीच्या घरून पळून आली आहे. माझे पतीचे दागिने सोबत आणले आहे. ते मी परत देईल. तसेच घटस्फोटानंतर पोटगी घेणार नाही. पतीच्या संपत्तीवरही माझा अधिकार राहणार नाही,असे प्रतिज्ञापत्र मोहितने आणून शांतीप्रियाला त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले दरम्यान, शांतीप्रियाने मोहितच्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिला. मार्च २०२३मध्ये शांतीप्रियाने गुन्हे शाखेच्या भरोसा सेलमध्ये तक्रार केली. भरोसा सेल शांतीप्रिया व मोहितमध्ये समेट घडवून आणण्यात अपयशी ठरले. अखेर शांतीप्रियाने अजनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e