याबाबत प्राप्त माहिती अशी की , सुलेमानी पत्थर देण्याचे बहाण्याने शेख युनूस शेख कादर बादशहा हे एक भंगार व्यावसायिक असून शेख युनूस हे श्रीनिवास पुरुम तिरुपती जिल्हा -चिंतूर (आंध्र प्रदेश ) येथील रहिवासी आहेत. या इसमाला युट्युबद्वारे आपल्या जाळ्यात ओढून लालगोटा येथे बोलावून त्यांच्या खिश्यातील रोख ६२ हजार रुपये व चार सोन्याच्या अंगठ्या (एक लाख रुपये किंमतीच्या ) त्यांना बंद खोलीत त्यांच्याकडून हिसकावून घेतले. हा प्रकार मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा हद्दीत उघडकीस आला.
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान याघटने प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अक्काबाई जोगिंदर भोसले, शिवदत्त जोगिंदर भोसले, दयाल जोगिंदर भोसले, जोगिंदर राजवंती भोसले, शिवकिशन जोगिंदर भोसले ,रिन्तु मंटूस पवार,कृष्णा भोसले, सर्व रा.लालगोटा अशा सात जणांविरुद्ध कलम ३९५,४२०,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप दूनगहू हे करीत आहेत .
0 Comments