चाळीसगाव तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या गुजरदरी येथे पीएसआयसह पोलिसांना मारहाण

चाळीसगाव तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या गुजरदरी येथे शेतात प्रोव्हीशन रेड करण्यासाठी गेलेल्या चाळीसगाव ग्रामीण पोलिसातील पीएसआयसह इतर पोलीस कर्मचारी व पंच यांना तिघांकडून शिवीगाळ करु, मारहाण करण्यात आली आहे. तसेच पीएसआय यांच्या गणवेशाचे देखील नूकसान करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. हि घटना दि,१६ रोजी घडली असून या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या गुजरदरी येथील दुर्गभ भागात सपोनी धरमसींग विठ्ठल सुंदरडे हे पोलिसांच्या स्टाप व पंचासह गुजरदरी येथे गोटीराम मोहन चव्हाण यांच्या शेत शिवारातील शेतात प्रोव्हीशन रेड करण्यासाठी गेले होते.

रेड करु नये म्हणून लखन सुदाम राठोड, रामेश्‍वर सुदाम चव्हाण, भास्कर ऊर्फ पिट्टु मोहन चव्हाण सर्व रा.गुजरदरी यांनी पोलीस व पंच याना शिवीगाळ करत, हाताचापटांनी मारहान केली. तसेच पीएसआय सुंदरडे यांच्या हातातील पंचनाम्याचा कागद फाडुन टाकला व त्यंाची कॉलर पकडून, नेमप्लेट हिसकावून घेेतली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथळ आनला म्हणून सपोनी धरमसींग विठ्ठल सुंदरडे यांच्या फिर्यादीवरुन भादवी कलम ३५३, ३३२, ४२७, ५०४, ३४ आदि प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.कुणाल चव्हाण हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e