नंदुरबार दंगल प्रकरणी २७ जणांना अटक; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

नंदुरबार शहरात रात्री झालेल्या दंगली प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला असून २७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दंगल प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून आरोपींवर विविध कलमान्‍वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 
नंदुरबार शहरात रात्री उसळलेल्‍या दंगलीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. रात्री पोलीसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शहरात शांतता प्रस्थापित झाली असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडिया वर कोणी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करू नये; पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून पोलीस यंत्रणा सतर्क असून कुणाची गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे.

पोलिस जखमी

या प्रकरणात पोलीस अधिकारी आणि काही कर्मचारी देखील जखमी आहेत. येणारे सण उत्सव लक्षात घेता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या दंगलीत आरोपींवर कलम ३०७, ३०८, ३५३, ३३३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e