नंदुरबारात सहा अवैध सावकारांविरुद्ध गुन्हा

व्याजाचे पैसे  देवूनही वेळोवेळी जादा पैशांची मागणी करणार्‍या नंदुरबारातील सहा अवैध सावकारांविरुद्ध  उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ.कोमल राम नाथानी (रा.जयहिंद कॉलनी, नंदुरबार) यांचे पती राम मोहनदास नथानी यांना एक वर्षापुर्वी सुनिल बाबुराव पाटील (रा. शाहुनगर नंदुरबार) यांच्याकडून 2 लाख रुपये 1500 रुपये रोज या दराने, मोहन सोमा सोनवणे (रा. मिशन शाळेजवळ सिंधी कॉलनी नंदुरबार) यांच्याकडून 2 लाख रुपये 1200 रोज दराने, सावंत सोनवणे (रा. मिशन शाळे जवळ नंदुरबार) यांच्याकडून 15 हजार रुपये, कैलास सोनवणे (रा. मिशन शाळे जवळ नंदुरबार) यांच्याकडून 20 हजार रुपये, मनोज चौधरी (रा. नंदुरबार) यांच्याकडून 35 हजार रुपये, मनोज आव्हिडे (रा. सुरत) यांच्याकडुन 30 हजार रुपये व्याजाने व बाकी लोकांकडुन 5 टक्के व्याजाने घेतले होते.

त्याबदल्यात सुनिल बाबुलराव पाटील यास दोन आयडीबीआय, एचडीएफसी बँकेचे सहया केले कोरे चेक व मोहन सोमा सोनवणे याला सहया केलेले 4 कोरे चेक तसेच 100 रुपयांचे कोमल नाथानी व राम नाथानी यांचे सहया केले कोरे स्टॅम्प दिले. तसेच कोमल नाथानी यांची वहिनी पुजा गुरुमख कोटवाणी (रा.यवतमाळ) यांच्या बँकेच्या खात्यातून सुनील पाटील व मोहन सोनवणे यांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले.

तसेच सर्वांना त्यांचे पैसे व संपूर्ण व्याज दिले आहे. तरीदेखील नाथानी दाम्पत्याला वेळोवेळी त्यांच्या घरी येवून पैशांची व व्याजाची मागणी करुन दमदाटी करण्यात येत होती.तसेच फोनवरही पैशांची व व्याजाची मागणी करुन दमदाटी केली. सदर घटना दि.29 ऑक्टोबर 2022 ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत घडली.

याबाबत सौ.कोमल नाथानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात सुनील बाबुराव पाटील, मोहन सोमा सोनवणे, सावंत सोनवणे, कैलास सोनवणे, मनोज चौधरी, मनोज आव्हिडे यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 452, 341, 504, 506, 507, 34, सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 2 व 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e