धाराशीव हादरले! भर वर्गात चित्रकलेच्या गुरुजीने केला विदयार्थिनीचा विनयभंग, पालकवर्ग चिंतेत

धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
धाराशीव : गुरुजी विद्यार्थ्यांची पिढी घडवतात असं सांगितलं जातं. गुरुजींना समाजात आदर्श मानलं जात. मात्र, धाराशीवमधील तुळजापूर येथे गुरुजीने या आदर्शालाच काळिमा फासण्याचे काम केले आहे. येथील एका कला शिक्षकाने एका १४ वर्षीय विदयार्थिनीचा भर वर्गात सर्व विद्यार्थ्यांसमोर विनयभंग केला. या घटनेमुळे तुळजापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
तुळजापूर शहरातील एका शाळेतील चित्रकलेच्या शिक्षकाने चित्रकला शिकवण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय विदयार्थीनीचा भर वर्गातच मुला-मुलींसमोर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पालक वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच या प्रकरणामुळे सर्वत्र या शिक्षकावर टीका होत आहे. तसेच संताप देखील व्यक्त केला जात आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक ६-१२-२०२२ रोजी सकाळी ०९ ते ९:३० दरम्यान आरोपी चित्रकला शिक्षकाने चित्रकला शिकवण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय विदयार्थीनीचा हात धरला. त्यानंतर तिच्या पाठीवरून हात फिरवत लज्जा वाटेल असे कृत्य वर्गातील मुलांसमोर आणि मुलींसमोर केले. या प्रकरणी पीडित मुलीने या घडलेल्या प्रकरणी शाळेतील प्रशासनाकडे तक्रार केली होती.
या प्रकरणी चौकशी करुन कार्यालयीन अधिक्षक यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाच्या विरुध्द तक्रार दिली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनला ३५४,३५४(अ) भारतीय दंड विधान ८,१२, बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियमानुसार आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी पोलीस उपविभागीय आधिकारी डॉ. सई भोरे पाटील या तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e