सदर शेतात हालचाली करत असल्याचे दिसून आले. पोलीसांचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच त्याने तेथून पळ काढला. परंतू धडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यास पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.
पोलीसांनी आंब्याचे झाडे असलेल्या शेताची पाहणी केली असता आतील बाजुस हिरवट रंगाचे गांजासदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. म्हणून धडगांव पोलीस ठाण्याच्या पथकाने संपूर्ण शेती पिंजून काढली असता तेथे संपूर्ण शेतातून ६४८ किलो ५० ग्रॅम वजनाचे ४५ लाख ३९ हजार ५०० रुपये किंमतीची एकुण ४ हजार ७९० गांजाची झाडे मिळून आले. सदर गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतली. याप्रकरणी रुपजा सिंगा पाडवी (रा.निगदीचा कुंड्यापाडा ता.धडगांव) याच्याविरुध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-१९८५ कलम ८ (क), २० (ब),(आयआय),(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण, पोलीस हवालदार पुष्पेंद्र कोळी,
राजेंद्र जाधव, जयेश गावीत, स्वप्निल गोसावी, पोलीस नाईक शशिकांत वसईकर, दिपक वारुळे, पोलीस अंमलदार मनोज महाजन, विनोद पाटील, रितेश बेलेकर, गणेश मराठे, जानसिंग वळवी, सायसिंग पाडवी, प्रतापसिंग गिरासे, सुनिलकुमार सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.
0 Comments