गांजा तस्करी रोखली, मुलूंडच्या दोघांना बेड्याशिरपूर तालुका पोलिसांची कारवाई: कारसह 7 सात लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड शिवारात शिरपूर तालुका पोलिसांनी  कारमधून होणारी गांजाची तस्करी  . मुलूंड येथील कारचालकासह  दोघांना ताब्यात  घेत त्यांच्याकडून 19 किलो गांजा व कार असा एकुण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईसाठी हाडाखेड सिमा तपासणी नाक्याचे प्रादेशीक परिवहन अधिकारी मंगेश वाघ यांना सोबत घेत पथकासह मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड शिवारातील हॉटेल ब्लॅक डायमंड समोर वाहनांची तपासणी सुरू केली. बर्‍याच वेळानंतर संशयीत वाहन इंदूरकडून शिरपूरकडे येताना दिसले. वाहनाला हात देवून साईडला लावण्याचा इशारा दिला. चालकाने वाहन साईडला उभे केले. चालकाने त्याचे नाव रज्जाक मेगदाद शेख (वय 54 रा.सिंधी कॉलनी, मुलूंड, मुंबई) व त्याचे बाजूस बसलेल्या इसमाने त्याचे नाव विनोद रमेश शर्मा (वय 33 रा. मुलूंड वेस्ट मुंबई ) असे सांगितले.
कारमध्ये काय आहे, असे विचारले असता त्यांनी वाहनात कुछ नही है साहब असे बोलू लागले. त्यामुळे दोघांना खाली उतरवून कारची आतून पाहणी केली असता चालकाच्या मागच्या सिटवर एका पांढर्‍या रंगाची गोणी दिसून आली. ती उघडून पाहीली असता त्यात गांजा आढळून आला. 1 लाख 97 हजार रुपये किंमतीचा 19 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ व पाच लाखाची कार (क्र.एमएच 03/ सी पी 5863) असा एकूण 6 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
याप्रकरणी रज्जाक मेगदाद शेख व विनोद रमेश शर्मा या दोघांना अटक करीत त्यांच्याविरुध्द शिरपूर तालूका पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 कलम 8 व 20 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोसई सुनिल वसावे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e