कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पोलिस हवालदाराचा महिलेवर बलात्कार

महिलेला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून शहर पोलिस दलातील एका पोलिस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल अशोक मद्देल (वय ४२, रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.
मद्देल हडपसर पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहे. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वडगाव शेरी भागातील शिवराणा प्रताप पोलिस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेली होती. तेथे तिची पोलिस हवालदार मद्देल याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्याने मुलगा आणि पतीस खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिच्याकडून त्याने वेळोवेळी पैसे उकळले.
दरम्यान, मद्देल याने महिला, तिचा पती आणि साथीदाराच्या विरुद्ध खंडणी उकळल्याची फिर्याद दिली आहे. मद्देलने दिलेल्या फिर्यादीनुसार महिला, तिचा पती आणि साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर घर खरेदी तसेच अन्य कारणांसाठी वेळोवेळी दोन लाख ३५ हजार रुपये घेतले. पैसे परत मागितल्यानंतर महिलेने बलात्कार केल्याची खोटी तक्रार दिली. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एक लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले, असे पोलिस हवालदार राहुल मद्देल याने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e