बारामती : तू मला आवडतेस म्हणत तरुणीचा विनयभंग; पुढे केले लज्जा उत्पन्न करणारे कृत्य, पळवून नेण्याचाही प्रयत्न

बारामतीत एका २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. आरोपीने या तरुणीला पळवून नेण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती : 'तू मला आवडते', असे म्हणत एका २२ वर्षीय तरूणीसोबत लगट करून तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दिनांक ६ मे) सकाळी पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास बारामतीत घडली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे
अरफाज सादिक आत्तार (रा. कोष्टी गल्ली, बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या आधारे पोलिसांनी कारवाई करत या तरुणावर गुन्हा दाखल केला
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आरोपी अरफाज हा फिर्यादी तरुणीचा पाठलाग करीत होता. यावेळी बंगल्याचे दरवाजे जवळ जाऊन फिर्यादीस बाहेर बोलून घेऊन, 'तू माझ्याबरोबर चल', असे म्हणून तिचा डावा हात पकडला. हात ओढून बंगल्याच्या गेटच्या बाहेर फरपटत गेटच्या बाहेर नेऊन माझ्याशी लग्न कर असे म्हणून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने केले मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य

दरम्यान, तिच्या गालावरून हात फिरवित तू मला आवडते असे म्हणून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच सदर तरुणीला ढकलून दिल्याने तिच्या गुडघ्याला जबर जखम झाली आहे. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याची फिर्याद सदर तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात अराफाज आत्तार याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e