मारीकणी तेवर असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रमेश तेवर याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाळपाडा परिसरात मारीकणी तेवर हे आपल्या कुटुंबासह राहतात. इडली विक्रीचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
मारीकणी यांना दारूचे व्यसन होतं. गुरूवारी दुपारच्या सुमारास मारिकनी हे दारू पिऊन घरी आले. त्यांनी सासरच्या लोकांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी मेव्हणा रमेश तेवर याने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला
मात्र मारीकणी काही ऐकत नव्हता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रमेशने मारीकणी याच्यावर चाकूने सपासप वार केला. या हल्ल्यात मारीकणी याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात रमेश तेवर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे
0 Comments