दोंडाईचात तलवारीच्या हल्ल्यात दोघे जखमी, दोन जणांवर गुन्हा

दोंडाईचातील आंबेडकर नगरात मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात लावलेल्या गाण्यावरून दोघांवर तलवारी जिवघेणा हल्ला करण्यात आला. त्यात दोघे जखमी झाले. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
भुषण माधवराव गवळे (वय 28 रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा) व सचदेव रविंद्र गवळी अशी दोघा जखमींची नाव आहेत. काल दि. 27 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वरील कारणावरून दोघांना कौसल मुसा खाटीक व सहिद मुसा खाटीक (रा. होळी चौक, दोंडाईचा) यांनी शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तलवारीने वार करीत दोघांना जखमी केले. याबाबत भुषण गवळे याने दिलेल्या फिर्यादीवरून कौसल खाटीक व सहिद खाटीक या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून तपास पोसई दिनेश मोरे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e