दरम्यान, तरूणीसोबत असलेल्या प्रियकराने त्यांना विचारणी केली असता त्यांनी प्रियकराकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर तरूणीसोबत असलेल्या प्रियकराने आरोपीच्या यूपीआय क्रमांकावर ५०० रूपये पाठवले. पण आरोपी तेवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी तरूणांकडे १० हजार रूपयांची मागणी केली. पण तरूणाने आरोपींना पैसे देण्यास नकार दिला.त्यानंतर रागावलेल्या आरोपींनी त्याला तेथील झाडाला बांधून ठेवलं आणि "तरूणीच्या गळ्यात असलेल्या सोन्याची चैन विकून आम्हाला पैसे दे" असं सांगितलं. त्यानंतर एक आरोपी तरूणीला घेऊन जवळच असलेल्या सोन्याच्या दुकानात गेला आणि दुसरा आरोपी तरूणाला पहारा देत तिथेच होता. पण सोनाराने तरूणीकडील चैन प्युअर नसल्याचं सांगत चैन घेण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी तरूणीला घेऊन परत जंगलात आला.
प्रकारानंतर आरोपींनी या दोघांना आमच्यासमोर सेक्स करा असा हट्ट धरला पण तरूणाने या गोष्टीला नकार दिला. त्यानंतर चिडलेल्या आरोपींनी तरूणाचे कपडे काढत नग्न केलं आणि तरूणीवर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर चिडलेल्या प्रियकराने तेथील बिअरची बाटली उचलली आणि एका आरोपीच्या डोक्यात मारली. यामुळे आरोपीच्या डोक्यात मोठी जखम झाली आणि घटनास्थळी रक्त सांडलं होतं. तेवढ्यात कुणी बघत नसल्याचा फायदा घेत तरूणी प्रियकराला तिथेच सोडून पळून गेली.आरोपीही घटनास्थळावरून पळून गेले. पण काही वेळानंतर प्रियकराला जाग आली आणि तो जंगलातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या चेहऱ्यावर हल्ला केल्याच्या खुणा होत्या. त्याच्याकडे स्थानिकांचे लक्ष गेल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण घटनास्थळी असलेलं रक्त पाहून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी पीडित तरूणीचा शोध घेण्यास सुरूवात केली.
घटनास्थळावर असलेल्या रक्ताबाबत प्रियकराकडे विचारणी केली असता आरोपीच्या डोक्यात बीअरची बाटली फोडल्यामुळे हे रक्त सांडलं असल्याचं प्रियकराने सांगितलं नाही त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता.
पण स्थानिक डॉक्टर, सोनार यांच्या मदतीने आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आलं पण तरूणीचा शोध लागत नव्हता. तब्बल १५ पोलिसांच्या टीमने जंगलात शोध सुरू केला. आरोपींनी तिचा बलात्कार करून खून केल्याचा संशय पोलिसांना होता पण तिच्या घराचा पत्ता शोधल्यानंतर ती घरी पोहोचल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळे पोलिसांच्या सर्व टीमने सुटकेचा नि:श्वास सोडला.सदर घटनेत पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, प्राणघातक हल्ला, खंडणी, धमकावणे याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या 376 (डी), 324, 377, 384, 504, 506 आणि 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments