ईडीची मोठी कारवाई! झवरेह सोली पूनावाला यांच्या ४१ कोटींच्या स्थावर मालमत्ता जप्त

झवरेह सोली पूनावाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध केलेल्या तपासात अंमलबजावणी संचालनालयानेच्या तरतुदींनुसार वरळीतील सीजे हाऊस येतील 41.64 कोटी रुपयांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीकडून  झवरेह सोली पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध  च्या तरतुदींखाली लिबेरलाइज्ड रेमिटन्स स्कीमच्या  गैरवापराच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पनामा पेपर्समध्ये ऑफ-शोअर संस्थांसंदर्भातील खुलाशांमध्ये त्याचे नाव आढळून आल्याचे इडीने म्हटले आहे 
पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी एलआरएस योजनेच्या तरतुदींचा गैरवापर करून परदेशात परकीय चलन पाठवले होते. त्यांनी कमाल अनुज्ञेय मर्यादेचा वापर केला आणि वर्ष 2011-12 पासून त्यांनी चुकीच्या पद्धतीने परदेशात पैसे पाठवल्याचे ईडीच्या तपासात असे सिद्ध झाले आहे.
तसेच 'कौटुंबिक देखभाल आणि स्वत:ची देखभाल' या बहाण्याने त्यांनी पैसे पाठवले असले तरी वास्तवात त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य परदेशात राहत नव्हता हे देखील ईडीच्या तपासातून सिद्ध झाले आहे. पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी LRS अंतर्गत पाठवलेला संपूर्ण निधी BVI स्थित स्टॉलस्ट लिमिटेडमध्ये  गुंतवल्याचेही समोर आले आहे.

स्टॉलस्ट लिमिटेडने  पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पाठवलेला निधी यूकेमध्ये चार मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरला. या मालमत्तांमध्ये पॅडिंग्टन आणि लंडन येथील चार अपार्टमेंटचा समावेश आहे. या व्यवहारांमध्ये FEMA चे उल्लंघन दिसून आले आहेत

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e