शिरपूर शहरात जुगार अड्ड्यांवर छापा

शहरातील व्यापारी संकुलात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १२ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईत आठ हजार ११० रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गुजराथी कॉम्प्लेक्स शेजारी काशीरामनगरमध्ये एका व्यापारी संकुलात जुगार खेळवला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना मिळाली होती.
त्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता पैसे लावून जुगार खेळविला जात असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली.जुगार खेळणाऱ्या १२ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक गणेश कुटे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e