धुळे तालुक्यातील कापडणे येथील आशिष सुनिल पाटील याचा दि.9 डिसेंबर 2022 रोजी श्री मंगल गार्डन येथे विवाह झाला होता. पंरतू नवरी मुलगी अल्पवयीन असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने कापडणे येथील ग्रामविकास अधिकारी नरेशकुमार तुकाराम सोनवणे यांनी चौकशी केली.
चौकशीत लग्नाच्यावेळी मुलीचे वय 16 वर्ष 9 महिने असल्याचे स्पष्ट झाल्याने सोनवणे यांनी काल पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन नवरा मुलगा आशिष सुनिल पाटीलसह मुलाकडील व मुलीकडील संबंधीतांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलिस उपनिरीक्षक चौरे करीत आहेत. विजय चौरे हे तपास करीत आहेत.
0 Comments