साईनाथनगर परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली

आरोपीत गणेशनगरचे चौघे || नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कामगिरी
नेवासा तालुक्यातील साईनाथनगर परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत आरोपींची टोळी हत्यारे व 1 लाख रुपये मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. आरोपींमध्ये राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील चौघांचा तर नेवासा फाटा येथील एकाचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती घेऊन त्यांचे विरुद्ध कारवाई करणे बाबत यांना आदेश दिले होते
या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, प्रशांत राठोड, कॉन्स्टेबल मधुकर मिसाळ, आकाश काळे, अमृत आढाव व चालक हवालदार संभाजी कोतकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून कारवाई करण्या बाबतच्या सूचना दिल्या होत्या.
गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, 5 ते 6 इसम मोटार सायकलवर दरोडा घालण्याच्या तयारीत नेवासा ते श्रीरामपूर रोडने नेवासा परिसरात येत आहेत. आता गेल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्याने पथक नेवासा ते श्रीरामपूर रोडवर साईनाथनगर शिवारात सापळा लावून थांबलेले असताना बातमीतील वर्णनाप्रमाणे दोन मोटारसायकलवर काही इसम जोरात येताना दिसले.
पुढे असलेल्या मोटारसायकल चालकाला हात दाखवून थांबण्याचा इशारा करताच त्याने मोटार सायकलचे दोन्ही ब्रेक जोरात दाबल्याने ते खाली पडले. पथकाने पडलेल्या इसमांना ताब्यात घेतले. त्याचवेळी मागील मोटार सायकलवर तीन इसम बसलेले दिसले. त्यांनी पथकास पाहून मोटार सायकल वळवून श्रीरामपूरच्या दिशेने पळून गेले. त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे शुभम अनिल काळे (वय 23) रा. गणेशनगर ता. राहाता, हल्ली रा. खंडेवाडी, ता. बिडकीन, जिल्हा औरंगाबाद व दीपक अरुण चव्हाण (वय 24) रा. नेवासा फाटा असे असल्याचे सांगितले.
त्यांचेकडे पळून गेलेल्या इसमांचे नाव गाव विचारले असता त्यांनी पळून गेलेल्या इसमाचे नाव अक्षय यशवंत आव्हाड, आनंद टकल्या अनिल काळे, शाहीद अकबर शेख सर्व रा. गणेशनगर, ता. राहाता असे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचेकडे एक हिरो कंपनीची मोटारसायकल, तीन मोबाईल फोन, एक लोखंडी सुरा, एक लाकडी दाडंके व मिरचीपूड असा एकूण 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. 543,/2023 भारतीय दंड विधान कलम 399, 402 सह आर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e