चेन स्‍नॅचींगच्‍या तपासात आरोपी अटक; अन्‍य चोरीचे गुन्‍हे झाले उघड

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नाचिंगच्या गुन्‍ह्याचा तपास करत असताना दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्या दोन्ही आरोपींवर  वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी आणि शस्त्र कायद्याविषयीचे दहा दहा गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी कुख्यात असून पोलीस आता पुढील तपास करत आहे
नागपूरच्‍या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घराबाहेर पाणी फेकायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी  घेऊन आरोपी पसार झाले. मात्र महिलेने प्रतिकार करत अर्धी सोनसाखळी तिच्याकडे राहिली आणि अर्धी चोरटे घेऊन पळाले. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना दोन संशयित आरोपी निष्पन्न झाले. त्यांच्यावर नजर ठेवून पोलिसांनी त्यांना अटक केली.
तपासात त्यांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही गुन्हेगार कुख्यात असून यांच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत. या तपासा दरम्यान आणखी दोन चोरीच्या घटना सुद्धा उघडकीस झाल्या असून त्यातही यांचा सहभाग असल्याचा पुढे आलं पोलिसांनी यांच्याकडून मुद्देमालासह एक कार आणि एक बाईक सुद्धा जप्त करण्यात यश मिळाले आहे

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e