धुळे पंचायत समितीतील शाखा अभियंता या पदावर कार्यरत असलेले तक्रारदार हे एप्रिल 2022 पर्यंत रत्नपुरा बीट येथे नेमणुकीस होते. या कालावधीतील बिटचे विभागीय लेखापरिक्षण (ऑडीट) झाले होते. या झालेल्या लेखा परिक्षणांच्या नावाने बक्षिस म्हणुन कनिष्ठ सहायक श्यामकांत सोनवणे हे तक्रारदाराकडे सुमारे आठ ते दहा दिवसांपासुन वेळोवेळी प्रत्यक्ष भेटीत व मोबाईलवर कॉल करून 3 हजार 500 रूपये लाचेची मागणी करीत होते.
याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने आज या तक्रारीची पडताळणी केली. त्यादरम्यान कनिष्ठ सहायक श्यामकांत सोनवणे यांनी तक्रारदाराकडे 3 हजार 500 रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडुन स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरूध्द देवपुर पश्चिम पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण खलाणेकर, भुषण शेटे,संतोष पावरा, गायत्री पाटील, प्रशांत बागुल रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रोहीणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
0 Comments