भुसावळ येथील न्यु एरीया वार्डातील रहीवाशी तथा नवमहाराष्ट्र जनरल स्टोअर्स संचालक ललीत प्रभाकर नेमाडे (वय 48) हे त्यांच्या पत्नी सौ.निता यांच्यासह चांगदेव ता.मुक्ताईनगर येथील देवदर्शन करून भुसावळ येथे आपल्या दुचाकी क्र. एमएच 19 डिएस 3356 ने परत जात होते.
दरम्यान महामार्गावरील फुलगाव उड्डाण पुलाजवळ त्यांचा दुचाकीवरील अचानक ताबा सुटून दुचाकी दुभाजकावर धडकल्याने ललीत नेमाडे यांच्या डोक्याला जबर मार लागला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यु झाला तर सौ.निता या किरकोळ जखमी झाल्याने त्यांनी मदतीसाठी आक्रोश केला
भुसावळ येथील न्यु एरीया वार्डातील रहीवाशी तथा नवमहाराष्ट्र जनरल स्टोअर्स संचालक ललीत प्रभाकर नेमाडे (वय 48) हे त्यांच्या पत्नी सौ.निता यांच्यासह चांगदेव ता.मुक्ताईनगर येथील देवदर्शन करून भुसावळ येथे आपल्या दुचाकी क्र. एमएच 19 डिएस 3356 ने परत जात होते.
दरम्यान महामार्गावरील फुलगाव उड्डाण पुलाजवळ त्यांचा दुचाकीवरील अचानक ताबा सुटून दुचाकी दुभाजकावर धडकल्याने ललीत नेमाडे यांच्या डोक्याला जबर मार लागला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यु झाला तर सौ.निता या किरकोळ जखमी झाल्याने त्यांनी मदतीसाठी आक्रोश केला.
मात्र, भरवेगात असलेल्या वाहनधारकांनी याकडे दुर्लक्ष केले. तर याच मार्गावरून भुसावळला पत्नीसह जाणारे मनोज पंढरीनाथ ढाके यांनी मदतीचा हात देवून पोलीसांना घटनेची माहिती देत परीसरातील नागरीकांच्या मदतीने दोघांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, ललीत नेमाडे यांचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगीतले.
तर सौ.निता यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघाताबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात सौ.निता नेमाडे यांनी फिर्याद दिल्यावरून नोंद करण्यात आली आहे. तपास पीएसआय परशुराम दळवी करित आहे. ललीत नेमाडे यांच्या अपघाताचे वृत्त भुसावळात समजताच त्यांचे नातलग व मित्र परिवाराने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती
0 Comments