नायब तहसिलदारांसह तलाठ्यावर भूमाफियांचा हल्ला, अतिक्रमण हटवल्याने झडप; पोलीस येताच भूमाफियांनी काढला पळ

मुंब्र्यातील डावले गावात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांवर भूमाफियांनी हल्ला केला. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होताच भूमाफियांनी धूम ठोकली.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्यात भूमाफियांनी केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्यावर भूमाफियांनी हल्ला केला. मुंब्र्यात शासकीय भूखंडावर अतिक्रमण केले होते. डावले गाव या ठिकाणी भूमाफियांनी कलेक्टर लँडवर अतिक्रमण केले आणि त्यावर दोन ते तीन मजली इमारत उभारली होती. बुधवारी या अतिक्रमणावर ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यास सुरू केली.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत तहसीलदार ठाणे येथील नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या माध्यमातून ही कारवाई पार पडत होती. डावले गावातील दोन मजली इमारत पाडायला घेतल्यानंतर भूमाफियांनी घोळका करुन नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि शीळ तलाठी रोहन वैष्णव यांच्यावर जमाव करुन हल्ला केला. या हल्ल्यात भूमाफियांनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली, त्यानतंर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर भूमाफियांनी तेथून पळ काढला.
नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्यासह तलाठ्यावर हल्ला केल्याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात तीन भूमाफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी डावले गावात अतिक्रमण करुन राहणाऱ्या नागरिकांना एक महिन्याची मुदत दिली आहे,त्यानंतर ही कारवाई पूर्ण करणार असल्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले.

अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईवेळी मंडळ अधिकारी रविंद्र काळे, तलाठी रोहन वैष्णव, तलाठी विश्वनाथ राठोड, तलाठी जीवन कोरे, तलाठी प्रीती घुडे, तलाठी राहुल भाटकर, तलाठी राहुल भोईर आणि ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी आदी जण उपस्थित होते.
कारवाईत दिरंगाई का?
मुब्र्यांतील डावले परिसरात कारवाई करण्यापुर्वी नायब तहसिलदार आणि तलाठ्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. पोलिसांना येण्यास थोडा उशीर झाला आणि तितक्यात या अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. कुठेतरी कल्पिता पिंपळे यांच्या हल्ल्यानंतर अश्या प्रकारे आजही आधिकाऱ्यावर हल्ला होण्याच्या घटना होताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे नक्कीच पोलीस प्रशासन अशा कारवाईवेळी अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी संक्षम ठरेल का? हेच पाहणं म्हत्त्वाचं असणार आहे. पोलीस वेळेत आले असते तर कारवाई पूर्ण होऊ शकली असती. तरी, पोलिसांनी भूमाफियांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे आणि कारवाईत पुढे सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e