दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी स्टेशन रोड कडून मोटरसायकल क्रमांक एम एच १५ जी क्यू ५९०४ वर अदनान सादिक खाटीक (वय १९) रा.मिलन चिकन, लक्ष्मी टॉकीज मागे गांधलीपुरा हा पांढऱ्या गोणीत झाकून तलवार आणताना आढळून आला. त्याला विचारपूस केली असता अदनान याने वडील सादिक सुपडू खाटीक (वय ४७) यांच्या नावाने तलवार मागवल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक करून शस्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक चौकशी साठी पोलिसांनी अदनान याची मोटरसायकल आणि भ्रमणध्वनी असा एकूण एक लाख १२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.
0 Comments