मनपा आयुक्त कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न; अतिक्रमणाला कंटाळला होता इसम

महापालिका प्रशासनाला वेळोवेळी अतिक्रमण हटवण्यासंदर्भात निवेदन देऊन त्याचबरोबर विनंती करून देखील  पालिका प्रशासन लक्ष देत नाही. धुळे महापालिका  प्रशासनाच्‍या या कारभाराला कंटाळून सदर इसमाने आयुक्‍त कार्यालयातच गळफास लावून आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार घडला.
दीपक शंकरराव घाटोळे (वय ४६) असे संबंधित इसमाचे नाव आहे. शहरातील एकनाथ विजय व्यायामशाळेजवळ अतिक्रमण करण्यात आले असल्याचा आरोप यावेळी घाटोळे यांनी लावला आहे. धुळे महापालिकेकडे हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात उलट संबंधितास जाणीवपूर्वक मदत करीत कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप लावत अखेर कंटाळलेल्या इसमाने धुळे महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोरच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांमुळे अनर्थ टळला

यावेळी सतर्क पोलिस कर्मचारी व पालिका कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळाला. पोलिसांनी तात्काळ संबंधित आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमास ताब्यात घेतले व पालिका अधिकाऱ्यांनी संबंधिताच्या मागणीची दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e