पुणे बंगळूर महामार्गावर पाेलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; १६ लाखांचा गुटखा पकडला, दाेघे अटकेत

तळबीड पाेलिसांनी पुणे आणि लातूर जिल्ह्यातील दाेघांना एनएच 4 वर सुमारे १६ लाखांच्या गुटखासह पकडले. पाेलिसांनी ही कारवाई वराडेनजीक केली असून तळबीड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडील वाहन देखील पाेलिसांनी जप्त केले आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एनएच 4 वर कर्नाटक येथून एक वाहन गुटख्याची वाहतूक करणार असल्याची माहिती पाेलिस दलास मिळाली. त्यानूसार तासवडे टोल नाका येथे पथकाने सापळा रचला. संबंधित वाहन येताच त्यास पाेलिसांच्या पथकाने थांबण्याची सूचना वजा इशारा केला. मात्र वाहन चालकाने न थांबता पुणेच्या दिशेने वाहन नेले
त्यानंतर पाेलिसांच्या पथकाने वाहनाचा पाठलाग केला. काही अंतरावर वाहन ताब्यात घेतले. या कारवाीत पाेलिसांनी 16 लाखांचा गुटखा व 8 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

पाेलिसांनी या गुन्ह्यात विलास बलू जाधव (वय ४५, रा. निगडी, ता. पिंपरी चिंचवड, जि. पुणे. मूळ रा. सनमडी, ता. जत सांगली) व सचिन संजय रेड्डी (वय २०, रा. कुमठा, ता. औसा, जि. लातूर सध्या रा. सानेचीक सानेचेंबर बिल्डिंग चिखली, जि. पुणे) यांना अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e