नालासोपारा : पाच वर्षांच्या बालिकेवर दोन अल्पवयीन मुलांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बालिका राहत असलेल्या बिल्डिंगमधील १३ व १५ वर्षांच्या दोन ओळखीच्या अल्पवयीन मुलांनी ११ जूनला संध्याकाळी मुलगी घरासमोरील गॅलरीमध्ये एकटी खेळत असताना अत्याचार केला होता. तिला फूस लावून आरोपी मुलांनी आपल्या घरात नेत तिच्यावर आळीपाळीने नैसर्गिक व अनैसर्गिक सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलीने आईला घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने शुक्रवारी विरार पोलिस ठाण्यात धाव घेत दोन्ही अल्पवयीन आरोपी मुलांबद्दल तक्रार दाखल केली आहे. विरार पोलिसांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलमाखाली संबंधित अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे
0 Comments