शाळा प्रशासनाने ताबडतोब पोलिसांना ही माहिती दिली असता फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. कुणाल सोनवणे यांनी सहकाऱ्यांसह येऊन हे पिस्तुल जप्त केले. तसेच हा विद्यार्थी हा अल्पवयीन असल्याने त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे. शाळेचे मुख्याध्यापक फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात संदर्भात कारवाई सुरू आहे पुढील तपास पोलीस करीत आहे
नेमकं काय घडलं?
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याकडे पिस्तुल आढळल्याने खळबळ उडाली आहे. इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांकडे पिस्तुल आढळली आहे. ही घटना शुक्रवारी १४ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी हे पिस्तुल कुठून आले, या बाबीचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
दप्तरात आढळलं पिस्तुल
0 Comments