जिल्हा बँक स्व-निधीतून पीकविमा हप्ता भरणार; कर्जदार 35 हजार शेतकऱ्यांना लाभ

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्व-निधीतून कर्जदार सरासरी ३५ हजार शेतकऱ्यांचा पीकविमा हप्ता भरण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या बैठकीत हा दिलासादायक निर्णय झाल्याची माहिती अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली. तसेच कर्जदारांनी १७ जुलैपर्यंत पीकविमा प्रस्तावासाठी आवश्‍यक ती कागदपत्रे संस्था सचिव किंवा बँक शाखा तपासणीसकडे जमा करावीत, असे आवाहन त्यांनी केले
श्री. कदमबांडे म्हणाले, की राज्य शासनाने सर्वंकष पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ राबविण्याची घोषणा केली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करायची आहे.यात निश्चित करण्यात आलेला पीकनिहाय हेक्टरी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्ता एक रुपया मात्र वजा जाता उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येईल.बँक उचलेल खर्च बोजाजिल्हा बँकेच्या सभागृहात अध्यक्ष कदमबांडे यांच्या अध्यक्षतेत संचालक मंडळाची बैठक झाली. तीत सर्वंकष विमा योजनेच्या अनुषंगाने कर्जदार शेतकऱ्यातर्फे प्रती अर्ज एक रुपया हा बँक स्वनिधीमधून भरणार आहे.हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?तसेच शेतकरीहितासाठी प्रत्येक कर्जदार सभासदाचा विमा प्रस्ताव अर्ज केंद्र शासनाच्या पीएमएफबीवाय (PMFBY) पोर्टलवर बँक स्वखर्चाने अपलोड करणार असल्याचा दिलासादायक निर्णय झाला.यानुसार धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक शाखेकडून प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याचा विमा प्रस्ताव अर्ज संस्थेच्या सचिवाकडून तयार करून पीएमएफबीवाय पोर्टलवर नोंदणीसाठी बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे मागविण्यात आला आहे.१७ जुलैपूर्वी संपर्क साधाबँकेच्या निर्णयानुसार खरीप हंगाम २०२३-२०२४ या कालावधीत पीककर्ज घेतलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक विविध कार्यकारी, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतील सभासद, संस्थांचे पदाधिकारी, वैयक्तिक कर्जदार, बँकेच्या सर्व हितचिंतकांनी पीकविमा प्रस्ताव अर्ज तयार करण्यासाठी सातबाऱ्याची झेरॉक्स प्रत, स्वत:च्या अपडेट आधारकार्डची झेरॉक्स, जिल्हा बँकेतील सेव्हिंग पासबुकची झेरॉक्स प्रत, पीकपेरणी झाल्याबाबत पेरणी तारखेसह पीकपेरणीचे स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रे १७ जुलैपूर्वी संस्थेचे सचिव किंवा बँक शाखा तपासणीसाकडे तत्काळ जमा करावीत, असे आवाहन अध्यक्ष कदमबांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी आणि सर्व संचालक मंडळाने केले.असा दिला जाईल लाभजिल्हा बँक ३५ हजार कर्जदार सभासद शेतकऱ्यांचा पीकविमा हप्त्याचा प्रत्येकी रुपया भरणा करेल. पीएमएफबीवाय पोर्टलवर प्रत्येक प्रस्ताव अपलोड करण्याचा सर्व खर्च बँक करेल. राज्य शासनाकडून कापसासाठी ५ टक्के, तर इतर पिकांसाठी २ टक्के पीकविमा हप्ता राज्य सरकार अदा करणार असल्याची माहिती बँकेने दिली. बँक पीकविमा हप्ता स्वनिधीतून भरेल.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e