राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडाळीनंतर ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत असलेल्या येथील पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांतच आपापला पवित्रा स्पष्ट केला. ७ जुलैला युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज महाजन यांनी बैठक घेऊन संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, रविवारी (ता. ९) ज्येष्ठ नेते दिनेश मोरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहणार असल्याचा निर्वाळा दिला.
अजित पवारांसोबत राहणार : दरम्यान, रविवारी आमोदे येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांची बैठक घेण्यात आली. माजी तालुकाध्यक्ष आशिष अहिरे म्हणाले, की शरद पवार आपले दैवत व पक्षाचा आश्वासक चेहरा आहेत.परंतु विकासाचा आणि उज्ज्वल भविष्याचा चेहरा म्हणून अजित पवार असून, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते दिनेश मोरे यांनी जनसामान्यांसाठी काम करण्याची क्षमता केवळ अजित पवारांमध्येच असल्याचे सांगितले. अल्पसंख्याक सेलचे माजी तालुकाध्यक्ष वाजिद शेख यांनी तालुक्यातील व शहरातील अल्पसंख्याक समाज अजित पवार यांच्या समर्थनात असल्याचे सांगितले. विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भूपेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. उपस्थितांनी हात उंचावून अजित पवार यांना पाठिंबा दर्शविला. अर्जुन पाटील, निंबा पाटील, बाळकृष्ण पाटील, संजय पवार नीलेश गरुड, पीतांबर पाटील, श्यामकांत मोरे, गौतम थोरात, राजेंद्र मोरे, देवीदास कोळी, हंसराज मोरे, हिरा कोळी, अॅड. समाधान भवरे, जाकिर शेख, शोएब पिंजारी, कलंदर खाटीक, आसिफ कुरेशी, मुस्तकीम शेख, सुलतान शेख, वाजिद मिर्झा, आकाश पावरा, विश्वास पावरा, जयेश पाटील, राज माळी, इमरान शेख, रिजवान मिर्झा, उस्मान कुरेशी, स्वप्नील सनेर, अक्षय सनेर, दिनेश देवरे, दुर्गेश पटेल, भावेश शिरसाट आदी उपस्थित होते.
0 Comments