मुली बेपत्ता हाेण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर; धक्कादायक आकडेवारी समोर

दिल्ली : देशात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत १३.१३ लाख मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या आठवड्यात संसदेत सादर केली. यातील सर्वाधिक मुली, महिला मध्य प्रदेशातील आहेत. त्यानंतर, महिला व मुली बेपत्ता होण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आकडेवारीनुसार, १० लाख ६१ हजार ६४८ महिला अठरा वर्षांवरील असून दोन लाख ५१ हजार ४३० मुली या अठरा वर्षांखालील आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने ही आकडेवारी संकलित केली आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक १,६०, १८० महिला आणि ३८,२३४ मुली या काळात बेपत्ता झाल्या आहेत. केंद्रशासित प्रदेशांत राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सर्वाधिक मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. दिल्लीत २०१९ ते २०२१ या काळात ६१,०५४ महिला आणि २२,९१९ मुली बेपत्ता असून जम्मू आणि काश्मीरमध्ये ८,६१८ महिला आणि १,१४८ मुली बेपत्ता झाल्या आहेत.दरम्यान, देशभरात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारने अनेक पावले उचलल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली. यात लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी फौजदारी कायदा (सुधारणा) कायदा, २०१३ लागू करण्याचाही समावेश आहे. त्यानंतर, १२ वर्षांखालील मुलींवर बलात्काराबद्दल फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारा फौजदारी कायदा (सुधारित) २०१८ लागू करण्यात आला
राज्य -महिला -मुलीमध्य प्रदेश - १,६०, १८० - ३८,२३४प.बंगाल - १,५६,९०५ - ३६,६०६महाराष्ट्र - १,७८,४०० - १३,०३३ओडिशा - ७०,२२२ - १६,६४९छत्तीसगड - ४९,११६ - १०,८१७

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e