पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरच्या (gwalior) हजीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिव नगर धर्मकांटे परिसरात ही घटना घडली आहे. पीडित महिलेचे चार वर्षापुर्वीचे लग्न झाले होते. दोनच दिवसापुर्वी ती आपल्या सासरी आली होती. त्या दिवशी पीडित महिलेचा पती दुकानावर गेला होता, तर सासू-सासरे हे गावी गेले होते. या दरम्यान घरी दीर अरूण सिंह आला होता. घरी दीर येताच वहिनीने त्याला आतल्या खोलीत बसवले आणि त्याच्यासाठी किचनमध्ये पाणी आणायला गेली
या दरम्यान दीर अरूण सिंहने घरी कोणीच नसल्याचे पाहुन गेट लॉक केला आणि पाणी घेऊन येणाऱ्या वहिनीसोबत अश्लील भाषेत तिच्याशी संवाद साधत चाळे करायला सुरूवात केली. वहिनीने या प्रकाराला विरोध करताच दिराने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच या घटनेची कुठेही वाच्चता केल्यास धमकी देऊन बदनामीची भीती दाखवली. या घटनेनंतर वहिनीने तत्काळ पोलीस ठाणे गाठत आरोपी दीर अरूण सिंह विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार आता पोलिसांनी आरोपी दिराचा शोध सुरू केला आहे.
पोलीस अधिकारी विजय भदोरीया यांनी या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी दिराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत, तसेच आरोपी लवकरात लवकर पकडला जाईल असे भदोरीया यांनी सांगितले आहे.या घटनेने सध्या मध्य प्रदेश हादरले आहे
0 Comments