तसेच दि.११ जुलै २०२३ रोजीच गुजरात राज्यातील व्यारा शहरात व पलसाणा शहरात अब्बास इबाबत शेख (इराणी) व त्यांच्या फरार साथीदाराच्या मदतीने महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी चैन ओढून पळून गेल्याची माहिती दिली.
ताब्यात घेण्यात आलेले इसम व वाहनाची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात ९० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची गळ्यातील मंगलपोत, ६७ हजार ५०० रुपये किमतीची एक काळे मणी असलेली १५ ग्रॅम वजनाची गळ्यातील मंगलपोत, ३२ हजार ५०० रुपये किमतीचे ५ विविध कंपन्यांचे मोबाईल, ५ लाख रुपये किमतीची एक मारुती सुझुकी कंपनीची डिझायर पांढर्या रंगाची कार (क्र.एमएच-१९-सीयु-६४८९) यांचा समावेश होता.
ताब्यातील संशयीत आरोपीतांनी नंदुरबार व जळगांव जिल्ह्यात येथे सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती दिली. त्यांच्यावर नवापूर, उपनगर, नंदुरबार शहर, रामानंद नगर पो.स्टे. जि.जळगाव , जळगाव तालुका पो.स्टे., चोपडा शहर पो.स्टे., भुसावल बाजारपेठ पो.स्टे., यावल पो.स्टे., चाळीसगाव शहर पो.स्टे. पलसाना पोलीस ठाणे जि. सुरत या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीताकडून १ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचे ३५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन, ३२ हजार ५०० रुपयांचे पाच मोबाईल व ५ लाख रुपये किमतीचे एक चारचाकी वाहन असा एकुण ७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्रातील व गुजरात राज्यातील सोनसाखळी चोरीचे एकुण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच पाचही आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नवापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेला सराईत आरोपी सादीक ईबाबत शेख (ईराणी) याचे विरुध्द् जळगांव, बीड, बुलढाणा, अहमदनगर व मध्य प्रदेश राज्यातील देवास जिल्ह्यात असे एकुण ३२ गुन्हे, अब्बास अली ईबाबत अली याच्याविरुध्द् ०१ गुन्हा, सखी मोहम्मद ईराणी याच्याविरुध्द् दोन गुन्हे, अल्पवयीन मुलाविरुध्द् मालमत्तेविरुध्द्चे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तपास करुन जबरी चोरीसारखा मालमत्तेविरुध्द्चा आव्हानात्मक गंभीर गुन्हा अवघ्या चार तासात उघड करुन नवापूर येथील गुन्ह्यातील व गुजरात राज्याच्या पलसाना येथे झालेल्या घटनेतील मुद्देमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगिरी करणार्या स्थानिक गुन्हे पथकाला नंदुरबार जिल्ह्याचे पेालीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रोख बक्षीस जाहीर केले.
गुन्ह्यातील एका फरार आरोपीताचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आले आहे. लवकरच त्यालादेखील बेड्या ठोकण्यात येतील. तसेच आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,
स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक राकेश मोरे, मोहन ढमढेरे, जितेंद्र तोरवणे, हेंमत सैंदाणे, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.
0 Comments