जिल्ह्यातील अमळनेर शहरातील भोईवाडा भागातील विशाल चौधरी आणि जळगाव शहरातील पिंप्राळा कोळीवाड्यातील विशाल कोळी या दोन्हींवर एमनपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. या दोघांना स्थानबध्द करण्याचे आदेश जारी झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या दाखल गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगाराला एमपीडीए कायद्यांर्गत एक वर्षासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे. विशाल भिका कोळी (वय-24) रा. कोळीवाडा पिंप्राळा, जळगाव असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगार विशाल कोळी यांच्या विरोधात दरोडा टाकणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जबर दुखापत, बेकायदेशीर मंडळी जमा करून अटकाव करणे, गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे, सट्टा जुगार खेळणे असे वेगवेगळे एकूण 11 गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याला यापूर्वी दोन वेळा हद्दपार करण्यात येऊन देखील त्याने हद्दपारचे आदेश उल्लंघन केले. त्यामुळे रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गुन्हेगार विशाल कोळी याच्याविरोधात अहवाल तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठवला.
त्यानुसार एम राजकुमार यांनी तो अहवालाचे अवलोकन करून अट्टल गुन्हेगार विशाल भिका कोळी याला एमपीडीए कायद्यांतर्गत 1 वर्षासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहे.आदेशानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, सुनील दामोदरे, पोलीस नाईक राजेश चव्हाण, पोहेकॉ विजय खैरे, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलाल सिंग परदेशी, किरण पाटील यांनी संशयित आरोपीला स्थानबद्ध केले आहे.
अमळनेरच्या विशाल चौधरीची येरवड्यात रवानगी
अमळनेर । प्रतिनिधी । शहरात दंगली आणि तलवार घेऊन दहशत माजवणार्या आरोपीविरुद्ध अमळनेर पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केली. विशाल दशरथ चौधरी (वय 27) असे या आरोपीचे नाव आहे. अमळनेर शहरातील भोईवाडा भागातील विशाल चौधरी हा शहरातील विविध दंगलीत सहभागी होऊन दहशत निर्माण करत होता. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जबरी लूट, तलवार घेऊन दहशत निर्माण करणे असे सहा दखलपात्र गुन्हे तर एक अदखलपात्र गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.
पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी एमपीडीए प्रस्ताव तयार करुन तो पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. प्रस्तावाची मंजुरी मिळताच पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस दीपक माळी, रवींद्र पाटील, शरद पाटील यांनी त्याला 1 ऑगस्ट रोजी सकाळी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, हेका. कैलास शिंदे, घनश्याम पवार, सुनील पाटील, योगेश पाटील, जितेंद्र निकुंभे यांनी आरोपी विशाल चौधरी याला विशेष वाहनाने पुणे येथील येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यासाठी नेले.
भुसावळच्या हसन अलीवरही कारवाई
0 Comments