पिंपरी-चिंचवड: रक्ताच्या तहानेने घेतला जीव, दारु पार्टीनंतर मित्राला दगडाने ठेचलं!

दारुच्या नशेत एका तरुणाने मित्रासोबत केलेलं कृत्य हे त्याच्या जीवावर बेतलं आहे. दारू प्यायला बसलेल्या मित्राने मित्राचे रक्त पिण्याची मागणी केली. तो तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने चक्क आपल्या मित्राच्या गळ्याचा चावा देखील घेतला. मित्राने केलेल्या हल्ल्यातून तरुणाने आपली सुटका केली. पण त्यानंतर या गोष्टीचा राग मनात ठेवून चावा घेणाऱ्या मित्राची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. पिंपरी-चिंचवडमधील  भोसरी एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली. 2 ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, इस्ताक खान असे गळ्याचा चावा घेणाऱ्या मयत व्यक्तीचे नाव आहे. तर राहुल लोहार असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 2 ऑगस्ट (बुधवार) रात्री 8 ते 11.30 दरम्यान घडली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपी राहुल लोहार याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मयत आणि आरोपी हे दोन्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचं समजतं आहेत
..म्हणून त्याने मित्राचा चेहरा दगडाने ठेचला, पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम
'दोन मित्र होते.. जे दारू पिण्यासाठी बसले होते. जे दारू प्यायल्यानंतर जो दुसरा मित्र होता इस्ताक खान हा त्याचा मित्र राहुल लोहार याला म्हणाला की, 'मला तुझं रक्त प्यायचंय..' राहुलला आधी वाटलं की, तो मस्करी करतोय.. तर तो देखील म्हणाला की, 'पी म्हणून..' त्यानंतर इस्ताकने थेट राहुलच्या गळ्याला एकदम कडकडून चावा घेतला.'
अचानक झालेल्या या हल्ल्याने राहुल एकदम हडबडून घेतला आणि इस्ताकच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मोठ्या धडपडीनंतर राहुलने आपली सुटका करून घेतली. हे दोघेही एका शेतात बसले होते. त्यानंतर शेताच्या बाहेर येऊन त्याने मोठासा दगड शोधून ठेवला आणि दगड बाजूला ठेवला.'

'त्यानंतर इस्ताकला त्याने बाहेर येऊ दिलं. शांत एका ठिकाणी बसू दिलं. मग त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर दगडाने प्रहार केला. त्यानंतर राहुल जोरजोरात ओरडू लागला.. 'तू मेरा खून पियेगा क्या?' असं म्हणत राहुलने इस्ताकचा चेहरा आणि डोकचं ठेचून काढलं.'
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर आरोपीला अवघ्या पाऊण तासातच अटक करण्यात आली.' अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e