शिंदखेडा पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर ‘एलसीबी’चा छापा

जिल्ह्यात अवैध धंदे बंद करण्याचा ‘फतवा’ जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंडे यांनी काढूनही शिंदखेडा पोलिस ठाणे हद्दीतील शिंदखेडा शहरात गावठी दारू, तर विरदेल येथे मटक्याच्या अड्ड्यावर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज दुपारी दोन जणांवर कारवाई केली. 
जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंडे यांनी गेल्या महिन्यात जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. अवैध धंदे ज्या पोलिस ठाणे हद्दीत सुरू असतील, त्या पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले होते.असे असताना आज दुपारी दीडच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शिंदखेडा शहरातील रज्जाकनगर येथे शायसिंग जुमान भिल (वय ७४) हे टेंमलाय रस्त्यालगत असलेल्या नदीपार भिलाटी वस्तीत काटेरी झाडा-झुडपांच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी हातभट्टीची ६० लिटर गावठी दारू तीन हजार ६०० रुपये कब्जात विनापास, विनापरमिट बाळगून तिची चोरटी विक्री करताना आढळून आले
त्यांच्याविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी योगेश वसंत साळवे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार एकलाख पठाण तपास करीत आहेत.विरदेल येथे मटक्याच्या अड्ड्यावर कारवाईविरदेल येथे आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास गाव विहिरीजवळ बंद टपरीच्या आडोशाला सार्वजनिक जागी अविनाश परशुराम परदेशी (वय ३४, रा. पाटण, ता. शिंदखेडा) हा कल्याण मटक्याचे अंक घेत असताना त्यांच्याकडे एक हजार १२० रुपये रोख व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिस कर्मचारी योगेश साळवे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस नाईक चेतन कंखरे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e