भाड्याची खोली घेत मुलीवर अत्याचार; मुलासह दोन महिला ताब्यात

तालुक्यातील करगाव तांडा येथील अल्पवयीन मुलीवर गावातीलच अल्पवयीन मुलाने आत्महत्येची व तिच्या घरच्यांना फसविण्याची धमकी  देत इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले. आरोपी अल्पवयीन मुलाने पीडित मुलीस पाटणादेवीला जायचे आहे, असे सांगून चाळीसगाव शहरातील रामकृष्णनगर मालेगाव रोड येथील महिलांच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला
संशयित अल्पवयीन मुलाने अत्याचार करून ही बाब तिने कोणालाही सांगितली, तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. सदर धमकीमुळे घाबरून मुलीने ही घटना कोणालाही सांगितली नाही. यानंतर आरोपी मुलाने पुन्हा त्या मुलीस त्याच घरातील खोलीत नेऊन तिचे इच्छेविरुद्ध शरीर संबंध केले. त्यानंतर तिसऱ्यांदा अल्पवयीन मुलाने पीडित अल्पवयीन मुलीस पुन्हा आत्महत्या करण्याची व त्यात तिची कुटुंबीयांना फसवण्याची धमकी देऊन तिला दुचाकीने नांदगाव येथे नेले. 

नातेवाईकांची पोलिसात धाव 

सदर बाब मुलीच्या नातेवाईकांना माहित झाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण व स्टाफ यांनी या मुला-मुलीचा शोध घेऊन संबंधित मुलगी व अल्पवयीन आरोपी मुलाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर अल्पवयीन मुलीस विश्वासात घेऊन तिच्या नातेवाईकांनी व पोलिसांनी विचारपूस केली. सर्व घटनेबाबतची सविस्तर माहिती तिने नातेवाईक व पोलिसांना दिली. त्यावरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सदर अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळ, जळगाव यांच्यासमोर हजर केले. 
मुलासह दोन महिलांना अटक 

गुन्ह्यात आरोपी अल्पवयीन मुलाला पीडित अल्पवयीन मुलीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी राहते घरातील एक खोली पाचशे रुपये घेऊन उपलब्ध करून देणाऱ्या संशयित शीतल ज्ञानेश्वर राठोड (वय ५१) व लता दीपक पाटील (वय ४५) यांना या गुन्ह्यात ‘पोक्सो’अन्वये अटक करण्यात आली आहे. दोन्ही महिलांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्याने त्यांची रवानगी जिल्हा कारागृह जळगाव येथे करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमे्श चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख व पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e