हिसवळ खुर्द ग्रामपंचायत सरपंचपद अनुसूचित जातीच्या जागेसाठी आरक्षित झाल्यामुळे या जागेवर विजयी झालेले एकमेव सदस्य कैलास फुलमाळी यांची सरपंचपदी निवड झाली होती. मात्र सरपंच फुलमाळी हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्याकडे सरपंच फुलमाळी यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता.
या अविश्वास ठरावासंदर्भात सोमवार (दि.14) नायब तहसीलदार चेतन कोतकर यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीत 9 सदस्य असून त्यापैकी 8 सदस्य सभेस उपस्थित होते. नवनाथ विलास आहेर हे सदस्य सभेस गैरहजर होते. उपस्थित 8 सदस्यांपैकी 7 सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने हात उंचावून आपला कौल दिल्याने बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
उपसरपंच संजय आहेर यांचेकडे पुढील कार्यभार सोपविण्यात येत असल्याचे नायब तहसीलदार कोतकर यांनी सांगितले. अविश्वास ठराव मंजूर होताच ग्रा.पं. सदस्यांनी जल्लोष केला
0 Comments