त्यांनी खरेदी केलेल्या धान्याची वाहतूक टेम्पो व इतर वाहनांतून मोहोळ हद्दीतून होत असल्याने, वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई व गुन्हा दाखल न करण्याकरिता दाजीसाहेब काकडे याने तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकरिता मासिक हप्ता म्हणून २५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत पटेल व कलबुर्गी या दोघांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यावरून १५ व १६ जून रोजी संबंधित विभागाने पडताळणी केली. तर १७ जून रोजी सापळा कारवाई केली. त्यावरून यातील संशयित दाजीसाहेब काकडेला गुरुवारी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया मोहोळ पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, अंमलदार उमाकांत महाडिक, शिरीष सोनवणे, पोलिस नाईक श्रीराम घुगे, नरोटे, हवालदार गायकवाड, श्याम सुरवसे यांच्या पथकाने केली
0 Comments