नववीच्या विद्यार्थिनीवर विंचूरला अत्याचार

येथील मारुती मंदिर परिसरात राहत असलेला एका २० वर्षीय तरुणाने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. जुबेर समशेर मेवाती (रा. जय बजरंग मंडळ, विंचूर) याने १४ वर्षीय इयत्ता नववीत शिकत असलेल्या मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केले.
पीडित मुलगी सिन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथील असून, सध्या विंचूर येथे वास्तव्यास आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिस ठाण्यामध्ये कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. संशयित तरुणाला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e