मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील कात्रड या गावात जावयाने सासू आणि पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबीक वादातून जावयाने पत्नी आणि सासूचा काटा काढला. संपूर्ण गाव झोपेत असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास जावयाने हे क्रूरकर्म केल्याचे पुढे आले आहे.
पत्नी आणि सासूची हत्या करुन जावई फरार होता. पण आता त्याने देखील या दोघांची हत्या करून आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. अहमदनगर शहरातील एमआयडीसी परिसरात गळाफास घेऊन जावायाने आत्महत्या केली. नूतन सागर साबळे (२३ वर्षे) आणि सुरेखा दिलीप दांगट (४५ वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या माय- लेकीची नावं आहेत.
सागर सुरेश साबळे असं आरोपी जावई असून त्याने देखील आत्महत्या केली आहे. सासुरवाडीतील घरात पत्नी आणि सासू झोपेत असतानाच आरोपी सागरने त्यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नूतन आणि सुरेखा यांचा जागीच मृत्यू झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. या दोघींची हत्या करुन सागर फरार होता. पण आता त्याने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
0 Comments