महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याने 'कोटा'त संपवलं जीवन; सहा महिन्यात २२ भावी डॉक्टरांनी मृत्यूला कवटाळले

वैद्यकीय प्रवेशासाठी अनिर्वाय असलेल्या नीट या परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण देशातून लाखो विद्यार्थी राजस्थानातील कोटा शहरात येत असतात. मात्र, मागील काही वर्षांपासून कोटा मधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात वाढ झाली आहे.
राजस्थानातील कोटा शहरात नीट परिक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी रविवारी आत्महत्या करत आपले जीवन संपवल्याची घटना घडली. परिक्षेत देऊन आल्यानंतर त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्याचा समावेश आहे. तर दुसरा विद्यार्थी बिहारचा असल्याची माहिती आहे. एकाने इमारतीच्या सहाव्या माळ्यावरुन उडी घेत आपले जीवन संपवले तर दुसऱ्या विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेत मृत्यूला कवटाळले. एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या लातूरच्या एका विद्यार्थ्याने कोटा येथे जवाहर नगरमध्ये कोचिंग सेंटरच्या इमारती वरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. अविष्कार संभाजी कासले (वय १७) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. परीक्षा दिल्यानंतर त्याने हे पाऊल उचलले आहे. कोचिंग सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी अविष्कार याला रुग्णालयात नेले होते. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे दोन सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. एका फुटेजमध्ये अविष्कार पाचव्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर धावताना दिसत आहे. दुसऱ्या फुटेजमध्ये तो उडी मारल्यानंतर पडताना दिसत आहे.
नीट तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊन आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोटा या शहरात नीट परिक्षेची तयारी देशभरातील भावी डॉक्टर मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, २०२३ या चालू वर्षातील पहिल्या सहा महिण्यातच येथे शिकणाऱ्या तब्बल २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मागील वर्षी २५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
विद्यार्थांच्या वाढत्या आत्महत्या प्रकरणानंतर कोटा जिल्हाधिकारी ओ पी बुनकर यांनी दोन महिने कोणत्याही परिक्षा घेण्यात येऊ नयेत असे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e