आता एका प्रकारणामध्ये कारवाई टाळण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे संशयित म्हणून तर त्यांच्या 'विश्वासू सहकाऱ्या'वर नाशिक विभागाच्या एसीबी पथकाने शिर्डी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस निरीक्षक महोदय नॉट रीचेबल असून वरिष्ठांनी चुप्पी साधली असल्याचे दिसत आहे.
शिर्डी परिसरातील एका पोलीस रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारावर कलम 354 अंतर्गतची कारवाई टाळणे, तडीपारीचा प्रस्ताव आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी एक ते दीड लाख रुपयांची मागणी शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पोलीस हवालदार संदीप गडाख याच्या माध्यमातून मागितली आणि तडजोडी नंतर 30 हजार रुपयांमध्ये तडजोड केल्याची तक्रार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
यानंतर एसीबी नाशिकच्या तपास अधिकारी उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी याबाबत कारवाई करत लाचेची मागणी करणाऱ्या हवालदार संदीप गडाख यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणाच्या प्राथमिक तपास अहवालात मध्ये पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ याचा संशयित म्हणून समावेश आहे.
0 Comments