गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी तहसीलदारांनी लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.
नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील एका जमिनीतून मुरूम उत्खननाचे प्रकरण समोर आले होते. त्याबाबत नियमानुसार पाचपट दंड आणि जागा मालकास जागा भाडे असे मिळून एकूण १ कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपये इतका दंड ठोठवण्यात आला होता.
मात्र या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चौकशीसाठी तहसीलदारांकडे पाठवण्यात आले होते. याबाबत जागेची पडताळणी करण्यासाठी तहसीलदारांनी बहिरम हे राजुर बाहुला येथील तक्रारदारांच्या जमिनीवर गेले.त्या ठिकाणी त्यांनी याप्रकरणी तडजोड करण्यासाठी आणि दंडाची रक्कम कमी करण्यासाठी १५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आला
0 Comments